प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Shiv Sena Mp Sanjay Raut) यांची रवानगी आता आर्थर रोड (Arthar Road) जेलमध्ये झालीय. पुढच्या 22 ऑगस्टपर्यंत त्यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्येच असणाराय.  तिथं राऊतांना घरचं जेवण मिळणार की जेलचं? त्यांना जमिनीवर झोपायला लागणार की बेड मिळणार? पाहूयात हा रिपोर्ट. (shiv sena mp sanjay raut sent to judicial custody till aug 22 at arthur road jail patra chawl scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा मुक्काम आता येत्या 22 ऑगस्टपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये असणाराय. माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यापाठोपाठ संजय राऊतही आता आर्थर रोड जेलमध्ये कैदी बनलेत. राज ठाकरे, मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांनी केलेली राऊतांबद्दलची भविष्यवाणी खरी ठरलीय. 



पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी 14 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यानंतर जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून राऊतांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये झाली. त्यांचा कैदी नंबर काय आणि त्यांना नेमकं कोणत्या बराकीत ठेवलंय, याची माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आलीय.


ईडीच्या कोठडीत असताना खेळती हवा असलेली रुम मिळावी, असा आग्रह राऊतांनी धरला होता. मात्र आता आर्थर रोड जेलमध्ये त्यांना इतर कैद्यांप्रमाणं बंद खोलीत ठेवलं जाणाराय. जेलमध्ये बेडची व्यवस्था व्हावी, अशी मागणी राऊतांनी सोमवारी केली.


तेव्हा जेलच्या नियमानुसार बेडची व्यवस्था करावी, असं कोर्टानं सांगितलं.  संजय राऊत यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालीय. त्यामुळं जेल कोठडीत त्यांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास कोर्टानं परवानगी दिलीय.


कधी काळी क्राईम रिपोर्टर असलेले संजय राऊत. ज्या जेलमध्ये कसाब, अबू सालेम, संजय दत्त, आर्यन खान यांना ठेवलं होतं. ज्याठिकाणी अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरूंगवास भोगतायत, तिथंच आता संजय राऊतांचाही मुक्काम असणाराय.