मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) जोरदार निशाणा साधला. राणे यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) होते. मविआमधल्या मंत्र्यांना आता एकामागो माग अटक होणार असा खळबळजनक दावाही नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला. 


राणे घाबरले म्हणून भाजपात गेले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांना तात्काळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, ते पडण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नारायण राणे यांच्यासारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिले नाहीत, राणे घाबरले म्हणून त्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला असा सणसणीत टोला लगावला.


आता त्यांना काही बक्षिसी मिळाली असेल म्हणून ते बोलत आहेत, हे सरकार 25 वर्ष चालेल, कोणी त्याची काळजी करु नये, असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.  


शिवसेनेला शहाणपण शिकवण्याचा अधिकार नाही


शिवसेना खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांनीही नारायण राणे यांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. देशभरात नारायण राणे यांनी जेवढा इतरांच्या पाठित खंजीर खुपसला आहे, तेवढा कुणी खुपसला नसेल. त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसला. सोनिया गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे त्यांना शिवसेनेला शहाणपणा शिकवण्याचा अधिकार नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.


कलाबेन डेलकर यांच्या विजयाची समीक्षा करण्याऐवजी देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेला भाजपाला जो धडा शिकवला आहे, त्याचं आत्मचिंतन करा, पण आत्मचिंतन करण्याची नारायण राणे यांची कुवत नाहीए, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे. 


केवळ सत्तेसाठी लाचारी करणारे नारायण राणे कोणत्या आधारावर शिवसेनेला शहाणपण शिकवत आहेत, त्यांना काय अधिकार आहे, असा सवाल विनायक राऊत यांनी विचारलं आहे. नारायण राणे यांनी स्वत:चा कितीवेळा पराभव झाला ते पहावं, त्याची चिंता सो़डून शिवसेनेच्या पराभवाची चिंता नारायण राणेंना लागली असेल पण महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.


सेनेला शिव्या घालण्यासाठी, कोकलण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद दिलंय, राणे ज्या ज्या पक्षात जातात त्या पक्षाला पणवती लागलीय आणि कालच्या पोटनिवडणुकीन त्याची सुरुवात झाली आहे, अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली आहे.


नारायण राणे यांनी काय केले होते आरोप


मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या मोक्यावर फटाने न फोडण्याचं आवाहन केलं. धूर नको, प्रदूषण नको असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं. पण, असे फटाके आघाडी सरकार मध्ये मिळतील. बारामतीत आवाज नाही धूर नाही असे फटाके फुटलेही असं म्हणत राणेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. आघाडीच्या मंत्र्यांना आता एकामागोमाग एक अटक होणार असा खळबळजनक दावा करत त्यांनी अनिल देशमुख प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. 


मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना शेतकरी , एसटी कर्मचारी आत्महत्या करतात, राज्यातील आर्थिक अवस्था यावर कधी तरी वक्तव्य करावं, भूमिका मांडाव्यात असं वक्तव्य केलं.