मुंबई : ''काहींना असं वाटतं शिवसेना (Shiv Sena) ही उघड्यावर पडलेली एक वस्तू आहे. जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं. तसं नाही आहे. शिवसेनेची पाळंमुळं 62 वर्ष तर सरळ दिसत आहेत. पण त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या आजोबानी या विचारांची पेरणी केली आहे.'', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक'च्या 62 व्या वर्धापन (Caricature Weekly Marmik) दिनानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संबोधन केलं. या दरम्यान त्यांनी नाव न घेता टोला लगावला. (shiv sena party chief uddhav thackeray critisize to cm eknath shinde in 62nd anniversary of marmik weekly celebration)


....तरी शिवसेना नष्ट होणार नाही


"शिवसेना हा विचार आहे. कुणीही तो घेऊन जाऊ शकत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला 'मार्मिक' टोला लगावला. भाजपची कितीही कुळं उतरली तरी शिवसेना नष्ट होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. महाराष्ट्रात सरकार आहे कुठे? असा सवाल करतानाच पंतप्रधान मोदींच्या 'हर घर तिरंगा' अभियानावरही त्यांनी टीका केली.