मुंबई : संजय राऊत यांना 9.30 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतलं. त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आलं. ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतरही ट्वीट करून आणि प्रत्यक्ष समोरासमोरही प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत म्हणाले, ''आम्ही लढत राहणार. महाराष्ट्र आणि शिवसेना कमजोर नाही. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी लढत राहणार. मी बाळासाहेब ठाकरे यांचा खरा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी लढत राहणार असं संजय राऊत म्हणाले आहेत.'' 


पुढे संजय राऊत म्हणाले, ''महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे. खोटे कागदपत्र, पुरावे गोळा करून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मात्र मी झुकणार नाही, तर लढत राहणार. सगळ्यांना माहिती आहे किती वाईट राजकारण सुरू आहे.''


''शिवसेनेला संपवण्यासाठी हे सगळं सुरू आहे हे समजतं आहे. भाजपच्या दोन नेत्यांनी माझ्यावर दबाव आणला. त्यासंबंधी 6 महिन्यांपूर्वी व्यंकया नायडू यांना पत्र लिहिलं. माझ्याविरोधात खोटो आरोप लावण्यात आले.''


''संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही. मला अटक करणार आहेत आणि मी अटक करून घेण्यासाठी जात आहे.''