नवी दिल्ली : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवडे वेळ मागितला आहे. कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येईपर्यंत आयोगानं निर्णय घेऊ नये. अशीही विनंती ठाकरे गटाने केली आहे. 
 
शिवसेना पक्ष मोठा प्रादेशिक पक्ष असल्याने त्यासंबधीचे कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्यास वेळ लागत असल्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून 4 आठवड्यांचा वेळ निवडणूक आयोगाला मागण्यात आला आहे.
 
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आहे. त्यामुळे आयोग ठाकरे गटाला हा वेळ देते का याकडे शिवसैनिकांचे लक्ष असणार आहे.
 
शिवसेनेतून 40 आमदार आणि 12 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर, शिंदे गटाने पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव यावर दावा सांगितला आहे. तर ठाकरे गटाकडून हा दावा फेटाळून लावत निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतील कलहावर निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.