मुंबई : मंगळवारी मुंबईत झालेल्या पावसानंतर अनेकांना बराच वेळ पाण्यात राहावं लागलं, अशा नागरिकांना लेप्टोस्पारोसिर सारखे गंभीर रोग होण्याची शक्यताय. हा धोका लक्षात घेऊन शिवसेनेनं उद्यापासून मुंबईत आरोग्य शिबिरं घेण्याचं ठरवलंय. या ठिकाणी ज्यांना अनेक तास पाण्याच्या संपर्कात राहवं लागलं आहे अशा सर्वांवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष मेळावा आज आयोजित करण्यात आला. यावेळी मंगळवारी उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू पावलेल्या सुप्रसिद्ध डॉ दीपक आमरापूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. मंगळवाराच्या पावसानं  पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे आता त्यावर मलमपट्टी करण्यासाठी आरोग्य शिबिरांचा मार्ग सेनेनं अवलंबलाय. 


या पदाधिकारी मेळाव्यात मुंबईत साठलेल्या पाण्याचं खापर उद्धव ठाकरेंनी मेट्रोच्या कामावर फोडलं. शिवाय राज्य सरकारकडून होणाऱ्या कामामधल्या दिरंगाईविषयी कधी तरी कारवाई होईल का ? असा संतप्त सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला.