दीपक भातुसे, झी मीडिया मुंबई :  केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर नाराज शिवसेनेच्या हालचालींना वाढल्या असल्याचं दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे,  संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळ विस्तारात एनडीएच्या घटक पक्षांना विचारात घेतलेल गेलेले नाही.


फक्त भाजपच्याच खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे नव्यानेच एनडीएत दाखल झालेल्या नितीश कुमार यांच्या पक्षालाही अजून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.


शिवसेनेच्या आजच्या बैठकीला संजय राऊत, रामदास कदम, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर आदी वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.