मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवडी-न्हावाशेवा सी लिंकमुळे (Shivdi Nhava Sheva Sea Link) नवी मुंबई ते मुंबई (Navi Mumbai to Mumbai) अंतर 50 मिनिटांनी कमी होणार आहे. हा सी लिंक पूर्ण झाल्यास नवी मुंबई ते मुंबई अंतर केवळ 20 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. या सी लिंकचं जवळपास 80% काम पूर्ण झाला असल्याचा दावा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. आज आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएमआरडीद्वारे (MMRDA) मुंबईकरांसाठी महत्वाचे प्रकल्प सुरू आहेत. सत्तेत असताना आम्ही दर महिन्याला प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घेत होतो. अजूनही आढावा घेत आहोत. सध्याच्या सरकारचा राजकारणावर फोकस असून विकासकामांना कुठेही महत्व दिले जात नसल्याचे दिसत असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.


शिवडी-न्हावाशेवा म्हणजेच मुंबई पोरबंदर प्रकल्प ज्याला इंग्रजीत ट्रान्स-हार्बर रोड (Trans Harbour Road) असेही म्हणतात. शिवडी-न्हावाशेवा देशातील सर्वात मोठा सी लिंक म्हणजे समुद्रातून जाणार सर्वात मोठा पूल ठरणार आहे. एकूण 22 किलोमीटर लांबीचा हा सी लिंक असणार आहे. हा सी लिंक उभारण्यासाठी तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. 


हा सी लिंक विरार, अलिबागलाही विविध रस्त्यांद्वारे जोडला जाणार आहे. कोस्टल रोडला हा रोड पुढे जोडला जाणार आहे. भविष्यात मुंबईत सिग्नल फ्री रिंग रोड बांधला जाणार असून या रिंग रोडलाही हा सी लिंकचा रोड भविष्यात जोडला जाणार आहे.