ठाणे: शिवसेनेच्या ५४ आमदारांपैकी ३५ आमदार उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ते रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अकार्यक्षम आहे. सरकार कसे चालवायचे हेच उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. नुसते सरकार स्थापनेसाठीच त्यांनी पाच आठवडे घेतले. त्यामुळे अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या, अशी टीका राणे यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भांडणे कमी करा, अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते, ते पोकळ ठरले. या सरकारने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा करून जो शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये अंतिम तारखेचा उल्लेख नाही. यामुळे कर्जमाफी कधी मिळेल, हे सांगता येत नाही, असेही राणे यांनी सांगितले. 


'उद्धवजी राऊतांच्या जिभेला लगाम घाला, मुजोरी खपवून घेणार नाही'


भाजप केंद्रात सत्तेत असून महाराष्ट्रातदेखील सर्वाधिक आमदार आहेत. यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही. भाजपाचे १०५ आमदार असून, शिवसेनेचे ३५ आमदार नाराज आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल, अशी शक्यता नारायण राणे यांनी बोलून दाखवली.