मुंबई : सांताक्रुझ विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण करण्यात यावं. तसंच महाराजांचा पुतळा विमानतळाच्या दर्शनी भागावर असावा या मागणीसाठी शिवसेना विधानपरिषद गटनेते अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. जीव्हीके एअरपोर्ट व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. सध्या जीव्हीके व्यवस्थापनाशी शिवसेना नेत्यांची चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नावं आहे. विमानतळासमोर छत्रपतींचा पुतळा आजूबाजूच्या देखाव्यासह पुन्हा उभारावा. पश्चिम महामार्गावर असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारणे, गड किल्ल्यांची प्रतिकृती उभी करणे अशी मागणी आम्ही गेली चार वर्ष करत आहोत अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास विमानतळ बंद पाडू असा इशारा देखील शिवसेनेने दिला.


पाहा बातमीचा व्हिडिओ