Uddhav Thakceray : पक्षाशी अर्थात शिवसेनेशी एकनिष्ठ असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी चाळीसहून अधिक आमदारांसोबत बंडखोरी केली आणि  महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना हादरा बसला. भाजपची खेळी यशस्वी ठरण्यासाठी राज्यात पूरक वातावरणही निर्माण झालं. अखेर 'आपल्याच लोकांनी साथ सोडली' असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. (shivsena as CM uddhav thakceray resigns from his post people supports him sharing emotional note)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकच नव्हे तर त्यांनी आमदारकीही सोडली. अतिशय भावनिक संदेशासह मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत पदत्याग केला. आठवड्याभरापूर्वीच ठाकरेंनी वर्षा बंगला, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी असणारं शासकीय निवासस्थान सोडलं तेव्हापासूनच गोष्टींना वेग आला होता. 


अखेर सर्वसामान्यांच्या मनात ज्याची भीती होती तेच झालं. कोरोना काळात राज्याला आधार देणारा, संकटातही सावरुन नेणारा, प्रत्येकाला मानसिक आधार देणारा मुख्यमंत्री या पदापासून दूर झाला. 


'मी पुन्हा येईन असं कधी म्हणालोच नव्हतो', असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी फार संयमी निर्णय घेत पदत्याग केला आणि त्यांच्यालेखी इतरांच्या मनातील मानाचं स्थान आणखी भक्कम केलं. 


रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला आणि सोशल मीडियावर, शहरातील रस्त्यांवर आणि गल्लीबोळात याचे पडदास उमटू लागले. 


संकटं समोर आ वासून उभी असताना, आपल्याच माणसांनी साथ सोडलेली असतानाही उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमी पाऊल उचलत हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानं सर्वांच्या मनात कालवाकालव झाली. 


सर्नसामान्यांनी, 'एक सर्वोत्तम मुख्यमंत्री सत्तेतून जातोय' अशी प्रतिक्रिया दिली. भाजपनं राजकारणातील खेळी जिंकली असूनही हा त्यांचा पराभवच आहे, अशाही प्रतिक्रिया काहींनी दिल्या. कारण, ठरलं उद्धव ठाकरे यांना असणारा जनतेचा पाठिंबा. 


सत्ता येते जाते, पण हा देव माणूस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या हृदयात कायम राहील, असं म्हणत राज्यातील बहुतांश जनतेनं उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र म्हणून निरोप घेत त्यांच्या पुढच्या प्रवासात साध देण्याची तयारीही दाखवली. 



'इतना भी गुमान न कर अपनी जीत पर ''ऐ बेखबर'', शहर मेँ तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है', असं म्हणत काहींनी या पराकोटीच्या राजकारणाचा निषेध करत माणुसकी हरवल्याची खंतही व्यक्त केली. 




महाराष्ट्रातील या राजकीय बंडखोरीमुळं एकिकडे सत्तेची गणितं मांडली जात असतानाच दुसरीकडे जनमानसानं स्वीकारलेल्या नेत्याला मिळणारं हे प्रेम डोळे दिपवून जात आहे.