कृष्णात पाटील, मुंबई : काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी झी २४ तासला स्फोटक मुलाखत दिली आहे. महापालिकेतील वादाची ठिणगी राज्यातल्या महाविकास आघाडीसाठीही धोकादायक ठरणार असल्याचं रवी राजा यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे न राहता भाजपकडे जावं यासाठी खुद्द शिवसेना प्रयत्न करत असल्याचा रवी राजांकडून आरोप करण्यात आला आहे. 


'काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पदावरुन हटवण्यासाठी सेना-भाजप हे जुने मित्र पुन्हा एकत्र येत आहेत.' असा आरोप त्यांनी केला आहे.


'दादागिरी आणि दबावतंत्र वापरुन शिवसेना महापालिकेत कारभार करते, ही दादागिरी काँग्रेस सहन करणार नाही. कोणताही प्रस्ताव आला की, उपरसे आया है असं सांगितलं जातं. उपरसे आया म्हणजे कुठून आलाय, वर्षा की मंत्रालयातून ?'


'कोविड काळातील प्रस्ताव, ताज हॉटेलची दंडमाफी याबाबत विरोधी पक्षांना बोलुही दिलं गेलं नाही. जर, आम्हांला महापालिकेत सन्मान मिळणार नसेल तर, राज्यात परिणाम बघायला मिळतील. याबाबत,काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली आहे.  ते योग्य भूमिका घेतील.' असं ही रवी राणा यांनी म्हटलं आहे.