मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत व्यूहरचना आखण्यासाठी शिवसेनेची चाचपणी सुरू झालीय. यापूर्वी शिवसेनेनं दोनवेळा गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवलीय. आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी शिवसेनेनं चालवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये भाजपच्या राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून निवडणूक लढवावी की हार्दिक पटेल यांच्यासारख्या मोदी विरोधकांना पाठिंबा देण्यासाठी दौरा करावा, याबाबतचा अंदाज शिवसेनेकडून घेतला जातोय.


मुंबई महापालिका निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्याची परतफेड करण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातमध्ये पटेलांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच असेल, असंही पक्षातून स्पष्ट केलं जातंय.