मुंबई : ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं कळतं आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारनं शिवसैनिक दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आता आक्रमक झाली आहे. प्रताप सरनाईकांसह दोन्ही मुलांना तर संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवला होता. 


सरकार पाडण्यासाठी षडयंत्र असल्याचा शिवसेनेनं याआधी आरोप केला होता. पण आता शिवसेना थेट ईडीविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. याआधी शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर भाजपचं कार्यालय असल्याचा बॅनर लावून भाजपवर टीका केली होती.