मुंबई : आमदार फुटण्याच्या भीतीनं मढ बीचवर हलवण्यात आलेले शिवसेनेचे आमदार बीचवर आनंद लुटताना दिसत आहेत. आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत पाटील मढच्या बीचवर मोकळ्या हवेत रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. बीचवर गप्पांबरोबरच कार्यकर्त्यांसमवेत सेल्फी काढण्यातही सेनेचे आमदार मग्न असल्याचं पाहायला मिळत आहे. मढला रवाना करण्यापूर्वी सेनेचे आमदार मुंबईतील रंगशारदा हॉटेलवर वास्तव्यास होते. मात्र सत्तासंघर्ष शिगेला पोहचताच सेनेनं आपल्या आमदारांना मढ बीचवर पाठवून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन आठवड्यांचा काळ उलटून गेला आहे. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये अजून कोणतीच चर्चा सुरु झालेली नाही. दोन्ही पक्षांकडून ही तसा कोणता प्रयत्न झालेला नाही. सत्ता स्थापनेच्या कालावधीचा अखेरचा दिवस उजाडला तरी भाजप आणि शिवसेनेत एकमत झालं नाही. यावरुन दोन्ही पक्षांतील कटुता आणखीनच वाढल्य़ाचं चित्र आहे. 


अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरुन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळालं. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर खोटारडेपणाचा आरोप केला आणि सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच वाढला.