`युती`च्या निर्णयासाठी `मातोश्री`वर सेना खासदारांच्या बैठकीला सुरुवात
शिवसेनेसाठी एक ज्यादा जागा देण्यास भाजपा तयार असल्याचं सांगण्यात येतंय
मुंबई : मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची बैठक सुरू झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 'मातोश्री'वर ही बैठक सुरू आहे. अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, हेमंत गोडसे, गजानन कीर्तीकरांसह अन्य खासदारही उपस्थित आहेत. या बैठकीत शिवसेना भाजपा युतीच्या मुद्द्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जातंय. एकीकडे सोमवारी मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले असताना लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक वाचा :- शिवसेना-भाजप युतीवरून कलगीतुरा, उमेदवार हवालदिल
गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेसाठी एक ज्यादा जागा देण्यास भाजपा तयार असल्याचं सांगण्यात येतंय. युती झाली तर युतीच्या जागा वाटपाचं सूत्र २५-२३ असं राहील, अशी माहिती भापजच्या सूत्रांकडून मिळतेय.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं २६ तर शिवसेनेनं २२ जागांवर आपापले उमेदवार उभे केले होते. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये 'छोटा भाऊ' कोण? आणि 'मोठा भाऊ' कोण? याबद्दल चर्चा रंगली होती.
अधिक वाचा :- शिवसेनेशी युती न झाल्यास आपला विजय खडतर; भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांपुढे कबुली