मुंबई : संजय राऊत यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली. 22 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Sanjay Raut sent to 14 days judicial custody)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना औषधे आणि घरचे जेवण मिळावे अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना संबंधित औषधं उपलब्ध करुन देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.


न्यायालयाने संजय राऊत यांची वैयक्तिक बेडची मागणी फेटाळली आहे. जेल प्रशासनातर्फे उपलब्धतेनुसार बेड दिले जावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. संजय राऊत यांची वैद्यकीय तपासणी मुख्य वैद्यकीय अधिकारीकडून करावी आणि तो अहवाल कोर्टात दाखल करावा असे निर्देश ही न्यायालयाने दिले आहेत. संजय राऊत यांना आर्थर रोड कारागृहात नेणार आहेत.


जामिनाचा मार्ग मोकळा


पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. 8 ऑगस्टपर्यंत ते ईडी कोठडीमध्ये होते. आज ईडीची कोठडी संपत असल्यानं संजय राऊत यांना कोर्टात करणार हजर करण्यात आलं होतं. ईडीने त्यांची कोठडी न मागितल्याने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला. यानंतर आता संजय राऊतांचा जामिनीसाठी अर्ज करण्याचा पर्याय खुला झाला आहे.