Sanjay Raut Bail : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patrachawal Scam) खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) कोर्टाने मोठा दिलासा आहे. 2 लाखांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला. जामिनाला स्थगिती देण्याची ईडीने (ED) मागणी केली होती. पण ही मागणीही कोर्टाने फेटाळली. ईडीनं जामिनाच्या निर्णयाला विरोध केला होता. तसंच हायकोर्टात याचिका दाखल करेपर्यंत जामिनाला स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीनं पीएमएलए कोर्टाला केली होती. पण ही मागणी फेटाळल्याने संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात ईडीने हायकोर्टात याचिका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमएलए कोर्टाकडून जामीन
त्याआधी पीएमएलए  (PMLA) कोर्टानं त्यांना दोन लाख रुपयांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर केला. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा अनेकदा जामीन नामंजूर केला होता. तब्बल 100 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन देण्यात आलाय. संजय राऊतांना 31 जुलैला अटक करण्यात आली होती. 


आईचे डोळे पाणावले
संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो त्यांच्या आईला. आपल्या लेकाला जामीन मिळाला ही आनंदाची बातमी ऐकून त्यांचे डोळे पाणावले. आपल्या घराच्या गॅलरीत येत थरथरत्या हातांनी त्यांनी सर्वांनाच अभिवादन केलं. आपल्या लेकाला आता भेटता येणार या भावनेने त्या निशब्द झाल्या होत्या.  


कार्यकर्त्यांचा जल्लोष, कोर्ट नाराज
शिवसेना खासदार संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर कोर्टाबाहेर त्यांच्या समर्थकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यामुळे कोर्टानं नाराजी व्यक्त केली. नमाडला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.एकात्मता चौकात जमत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.