मुंबई : संजय राठोड (Sanjay Rathod)  यांनी कोराना काळात केलेल्या शक्ती प्रदर्शनावर वेगवेगळ्या पक्षातून नाराजी व्यक्त केली जात आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)  यांच्या पाठोपाठ खासदार संजय राऊत यांनी संजय राठोडांच्या शक्ती प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली (Sanjay Raut on Sanjay Rathod) आहे. संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनाकरता समर्थकांनी मोठ्या प्रमाणात पोहरादेवी येथे हजेरी लावली होती. 


काय म्हणाले संजय राऊत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी इथे झालेल्या गर्दीची गंभीर दखल घेत कारवाईचे सक्त आदेश दिलेत. आपल्या माणसाने नियम, कायदे मोडले तरी मुख्यमंत्री सोडणार नाहीत. कारवाई होईल असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. संजय राऊतांनी बुधवारी सकाळी या मुद्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 



काय म्हणाले बाळासाहेब थोरात?


मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणं बरोबर नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी नाराजी व्यक्त केली आहे.  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी लवकर करून विषय संपवायला हवा, असं देखील ते यावेळी म्हणाले. 


काय म्हणाले शरद पवार? 


संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची चिन्हं आहेत. संजय राठोड यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय, अशी सूत्रांची माहिती आहे. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्तिप्रदर्शनावरही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन होत असल्याचं चित्र दिसून येतं आहे. मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  दुसरीकडे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचं मंत्रिपज धोक्यात आलं आहे. 


संजय राठोड कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी ते त्यांच्या यवतमाळमधील निवासस्थानावरून मुंबईकडे रवाना झालेत. ३ फेब्रुवारीपासून मंत्रालय आणि शासकीय कामकाजापासून राठोड दूर होते. या काळात त्यांनी मंत्रिमंडळाच्या 2 बैठकांना दांडीही मारली. आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर राहणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राठोड प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.