मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सत्तास्थानपेसाठीच्या गणितांची मांडणी होऊ लागली. अनेक सूत्र आणि सत्तेची प्रमेय वापरूनही काही ही गणितं सोडवली जात नसल्यामुळे आता याविषयीचं कुतूहल राज्यातील जनतेच्या मनातही पाहायला मिळत आहे. एकिकडे सत्तास्थापनेसाठी सज्ज असल्याचं म्हणणाऱ्या भाजपचा रथ हा शिवसेनेने अडवून धरला आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असे असं ठामपणे सांगणाऱ्या संजय राऊत यांनी यादरम्यानच एक सूटक ट्विटही केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''सिर्फ हंगामा करना मेरा मकसद नही, 
मेरी कोशिश है कि, ये सूरत बदलनी चाहिए| 


मेरे सीने में नही तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकीन आग जलनी चाहिए'



असे दुष्यंत कुमार यांचे शब्द राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केले. हे शब्द वाचल्यानंतर राऊत यांनी ते नेमके का पोस्ट केले आहेत याचा अंदाज लावता येत आहे. सत्तास्थापनेच्या या चर्चांमध्ये आपल्या वक्तव्यांमुळे फक्त चर्चा आणि अफवांनी वादळं न उठता त्या वक्यव्यांना सत्यात उतरवत एका नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी आपण आग्रही असल्याचा सूर या ट्विटच्या माध्यमातून आळवल्याचं कळत आहे. 



भाजपने शब्द पाळला नाही, असं म्हणणाऱ्या राऊतांनी एकिकडे हे ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं. तर दुसरीकडे फडणवीस आणि शाह यांच्या दिल्ली भेटीवर अप्रत्यक्ष वक्तव्यही केलं. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही, लवकरच महाराष्ट्राच्या राडकारणाचा चेहरा बदलेल. महाराष्ट्राचा निर्णय हा इथे महाराष्ट्रातच होईल, असंही त्यांनी थेट शब्दांत स्पष्ट केलं. शपथविधी ही कोणाची मक्तेदारी नसल्याचं म्हणत त्यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भाजपच्या भूमिकांवर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालं.