मुंबई : डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची मूळ निशाणी. काळाच्या ओघात वाघ काहीसा मागे पडला. आणि शिवसैनिकांनी धनुष्य बाण हाती घेतलं... पण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वाघ अंगठीरूपानं परतलाय. 


शिवसैनिकानं चक्क वाघाची अंगठी बनवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या कृष्णा पवळे या शिवसैनिकानं चक्क वाघाची अंगठी बनवलीय. खासदार अरविंद सावंत आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते सोमवारी या वाघाच्या अंगठीचं शिवसैनिकांना वाटप करण्यात आलं. 


शिवसैनिकांतला आत्मविश्वास आणखी बळावेल


वाघाच्या अंगठीमुळं शिवसैनिकांतला आत्मविश्वास आणखी बळावेल, असा विश्वास सावंत यांनी बोलून दाखवला. दोनेक वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शिवबंधन बांधलं होतं. आता शिवसैनिक अंगठीच्या प्रेमात पडलेत.