मुंबई  : शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा (froze) निर्णय दिला आहे. मात्र हा आदेश हंगामी स्वरुपाचा असणार आहे. या आदेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (andheri bypoll election) शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी (Uddhav Thackeray) धक्कादायक आहे. अशाचत आता शिवसेनेने (Shivsena) थेट सर्वोच्च न्यायालयात (supreme court) दाद मागण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व निर्यणांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्राम (instagram) पोस्टद्वारे या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरे यांनी जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे. 



दरम्यान, शनिवारी निवडणूक आयोगाने चार तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना  नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. 10 ऑक्टोबरला नवीन नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचा आदेश आयोगाने दिले आहेत.