मुंबई : मुंबईत शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर या वचननाम्याचं प्रकाशन झालं. वचननामा प्रसिद्ध होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी विविध प्रचारसभांमध्येच आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे आता वचननाम्यात मतदारांना खूश करण्यासाठी आणखी काय असणार याबाबत उत्सुकता लागली होती. यापूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. तर भाजपचा जाहीरनामा १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यांपेक्षा वेगळा आणि मतदारांना आकर्षित करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करताना आदित्य ठाकरे, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर उपस्थिती होते. वचननमाम्यावर बारकोडही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा बारकोड स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवरही हा वचननामा तुम्हाला वाचता येऊ शकेल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.


'भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तर त्यातील चांगल्या योजनांचं नक्की स्वागत करु.' असं देखील या वेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


 


क्लिक करा : शिवसेनेचा वचननामा