कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी खोचक टिप्पणी करणाऱ्या अमृता फडणवीस यांना शिवसेनेच्या महिला आघाडीकडून इशारा देण्यात आला आहे. उद्या शिवेसनेची महिला आघाडी आक्रमक झाली तर मग देवेंद्र फडणवीसांनी मध्ये यायचे नाही. शिवसेनेची पद्धत तुम्हाला चांगलीच माहिती आहे. आम्ही अमृता फडणवीस यांना बघून घेऊ. आमच्या शेपटावर कोणी पाय दिला तर आम्ही त्याला सोडत नाही, असे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरूण सरदेसाईचा अमृता फडणवीसांना जोरदार टोला


महाराष्ट्राला अमृता फडणवीस नाव हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर कळले. त्यापूर्वी अमृता फडणवीस यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. याउलट ठाकरे घराण्यातील चार पिढ्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आधी स्वत:चे घर सांभाळावे आणि मग आम्हाला सांगावे, असेही विशाखा राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेनेची महिला आघाडी अमृता फडणवीसांना इंगा दाखवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


'सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथ पेशव्यांची बुद्धी भ्रष्ट केली'


अमृता फडणवीस यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याविषयी टिप्पणी केली होती. केवळ ठाकरे आडनाव असून भागत नाही. त्यासाठी व्यक्तीला तत्वांचे प्रामाणिकपणे पालन आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करावे लागते. त्यासाठी स्वत:चे कुटुंब आणि सत्ताकारणापलीकडे जाऊन विचार करावा लागतो, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले होते. यानंतर शिवसेना नेते अमेय घोले आणि वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांना टोले लगावले होते.