शिवशक्ती, भीमशक्ती, लहुशक्ती या तिन्ही शक्तींचा मिळून मुख्यमंत्री बसवणार; उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम वांद्रे येथे पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळा मार्ग दाखवला. शिवशक्ती, भीमशक्ती आणि आता लहू शक्ती एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आता युतीचे अनेक नव नविन प्रयोग पहायला मिळणार आहेत. शिवशक्ती(shivshskati) आणि भीमशक्ती(bhimshkati) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आता यांना लहु शक्तीची देखील साथ मिळणार आहे. शिवशक्ती, भीमशक्ती, लहुशक्ती एकत्र येणार आहे. या तिन्ही शक्तींचा मिळून मुख्यमंत्री बसवणार असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांनी केले आहे.
लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम वांद्रे येथे पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळा मार्ग दाखवला. शिवशक्ती, भीमशक्ती आणि आता लहू शक्ती एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राची ताकद एकवटत आहे. मला आनंद आहे. मी बोलू शकतो. रस्त्यावर उतरलो तर काहीही करू शकतो. ही ताकद म्हणजे शिवशक्ती, भीमशक्ती आण लहुशक्ती आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची बोलणी सुरु आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेसेनेला शह देण्यासाठी जबरदस्त प्लान आखला आहे.
एकनाथ शिंदे गट जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोबत घेऊ शकतो. खुद्द जोगेंद्र कवाडेंनी यासंबंधी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाने योग्य प्रस्ताव दिला तर त्यांच्यासोबत जाण्याची तयारी आहे असल्याचे वक्तव्य पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे.