धक्कादायक : दिराकडून वहिनीवर ऍसिड हल्ला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आरोपीला पोलिसांना केलं अटक
मुंबई : घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून विधवा वहिनीच्या तोंडावर अँसिड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. एका शुल्लक वादावरून दिराने आपल्या सख्या वहिनीच्या तोंडावर ऍसिड फेकलं आहे. (Shocking! Acid Attack on Women from Brother in Law in Ghatkopar )
शेजाऱ्याच्या दुकानात कामाला राहिलेल्याच्या रागातून आपल्या वाहिनीच्या अंगावर ऍसिड फेकलं. दिराने टॉयलेट स्वच्छ करायचे एसिड टाकून वहिनीला जखमी केले आहे. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले आहे. या दुर्घटनेत आरोपी दुकानमालकाचे हात आणि चेहरा भाजला असून, महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
या दोघांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी प्रबुद्ध कांबळे याला45 अटक केली आहे. आरोपी आणि तक्रारदार दुकान मालक हे शेजारी शेजारी राहतात. तक्रारदार सुदांशु प्रमाणिक यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे.
पीडित महिला ही विधवा असून तिने नोकरीबाबत विचारल्यानंतर तिला कामावर ठेवले. याचाच राग अनावर झाल्याने प्रबुद्ध याने हे कृत्य केले. या प्रकरणी घाटकोपर पोलिस अधिक तपास करत आहेत.