मुंबई | पवई तलावामध्ये जर तुम्ही गणेश विसर्जनासाठी जात असाल तर जरा जपून, कारण गेल्या काही दिवसात गणेश विसर्जनाच्या दिवशी पवई तलावात अचानक मगरीचं दर्शन झाल्यामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्रीच्या वेळी गणेश विसर्जन करताना अचानक एक मगर विसर्जन तलावाजवळ आली. सुदैवाने त्यावेळी या परिसरात कोणीही गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरले नव्हते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी पालिकेकडून या विसर्जन स्थळावर मगर येऊ नयेत यासाठी उपाययोजना केली जाते. परंतु या वर्षी त्या उपायोजना केल्यात का असा प्रश्न आता समोर येतो आहे. गणेशभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.


गणेश मंडळांच्या अनेक मोठ्या मूर्ती या तलावात विसर्जन केल्या जातात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सुदैवाने या मगरीकडे लक्ष गेल्याने मोठी हानी टळली. पवई तलावा जवळ याआधीही अशा प्रकारे मगरी आढळल्या आहेत. पण गणेशोत्सव दरम्यान प्रशासनाने या ठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.