आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती, `हे` सीसीटीव्ही फुटेज गायब
Aryan Khan Drug Case : आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना न्यायलायाने दिल्या आहेत.
Aryan Khan Drug Case : आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रग्स प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीला एनसीबी ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले नव्हते. आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्या चौकशी अहवालात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यात आर्यन खान एनसीबी ऑफिसमध्ये असतानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांचे सीबीआय चौकशी
दरम्यान, एनसीबीचे माजी रिजनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची आज सीबीआय चौकशी होणार आहे. सकाळी 11 वाजता ते चौकशीला हजर राहणार आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडेंनी शाहरुखकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे सीबीआयने याआधी वानखेडेंच्या घरावरही छापा मारला होता. तसंच चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आगामी सुनावणीपर्यँत वानखेडेंना अटक करु नये, असे आदेशन्यायालयानं दिलेत. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 22 मे रोजी होणार आहे.
सीबीआयकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल
आर्यन ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सीबीआयकडून अटक होण्याची शक्यता होती. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायलायात धाव घेत घेतली समीर वानखेडे यांना कोर्टाने दिलासा आहे. न्यायलायाने वानखेडे यांना पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना न्यायलायाने दिल्या आहेत. वानखेडे यांनी CBI ला तपासात सहकार्य करावं असे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंनी शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा सीबीआयनं दाखल केला आहे. याप्रकरणी वानखेडेंची चौकशी होणार आहे.
आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडेचे 25 कोटी रुपयांच्या खंडणीचे प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत आहेत. त्यामुळे वानखेडे अधिक अडचणीत अडकत चालले आहेत. या प्रकरणातील मोठी घडामोडी समोर आली आहे. अधिकाऱ्याची सध्या चौकशी सुरु असताना, त्याच्या दिल्ली बॉससोबतच्या व्हॉट्सअॅप चॅट्स लीक झाल्या आहेत. क्रूझवरील ड्रग्ज बस्ट प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला सोडून देण्यासाठी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये उकळण्याचा कथित प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.
ज्ञानेश्वर सिंग यांच्यासोबतचे WhatApp चॅट समोर
तसेच ताज्या अपडेटमध्ये, NCB अधिकाऱ्याचे त्याच्या दिल्लीचे बॉस, ज्ञानेश्वर सिंग यांच्यासोबतचे WhatApp चॅट समोर आले आहे. यात शाहरुख खानचा आर्यन खान, त्याच्या 8 मित्रांसह, मुंबईत क्रूझवर आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीला प्रोत्साहन देण्यासाठी 27 लाख रुपयांची मोफत तिकिटे, वेगवेगळ्या ड्रग्सची नावे यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आर्यन खान याला ऑक्टोबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती आणि दिवाळीच्या सुमारास त्याला जामीन देण्यात आला होता.
एका विशेष अहवालानुसार मिळालेल्या माहितीमध्ये समीर वानखेडे यांनी 2017 ते 5 वर्षांच्या कालावधीत यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव यांसारख्या देशांत कुटुंबासह सुमारे सहा वेळा खासगी भेटी दिल्या होत्या. दरम्यान, NCB या माजी अधिकाऱ्याने केवळ 8.75 लाख रुपये एवढीच रक्कम दाखवली होती. जी फ्लाइट तिकिटांच्या महागड्या श्रेणीसह व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे.