मुंबई : मुंबईतल्या भांडुपचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडेंनी क्षुल्लक कारणातून एका सामान्य दुकानदाराला केलेल्या मारहाणीनं साऱ्या भांडुपमध्ये संताप व्यक्त होतोये.गाडी वळवण्यास जागा मिळाली नाही, म्हणून पोलीस निरीक्षक रमेश खाडेंनी त्या दुकानदाराला जवळ बोलावून त्याच्या कानशिलात भडकवल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. भांडुपच्या जयशंकर नगर परिसरात ही घटना घडलीय. या परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे हे राऊंडवर असताना त्यांची गाडी वळविण्यास अडथळा निर्माण झाला यामुळे त्यांनी गाडीबाहेर उतरून स्कूटर चालकांना बोलावून घेतलं आणि त्याच्या कानशिलात लगावल्या.


या घटनेसंदर्भात पीडित व्यक्तीने पोलीस परिमंडळ-7 चे अखिलेश सिंग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलाय. त्यानुसार या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.


एकीकडे भांडुपमध्ये भांडुपमध्ये गुन्हेगारीचा प्रमाण वाढत असताना सामान्य नागरिकांवर पोलिसांची दबंगगिरी का? असा सवाल सध्या नागरिक विचारत आहेत.