मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. यानंतर विधानभवनात असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तात्काळ मातोश्रीकडे निघाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत घराकडे रवाना झाले, यावेळी त्यांच्याबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही होते. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी टाळलं.   


आतापर्यंतच्या ईडीच्या कारवाया शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होत होत्या. पण आता थेट ठाकरे कुटुंबियांपर्यंत ही कारवाई येऊन पोहचली आहे. दरम्यान, मविआ नेत्यांची आज किंवा उद्या एक तातडीची बैठक करतील अशी माहिती आहे, यासंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत . आशुतोष कुंभकोणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 


याप्रकरणाचे पडसाद उद्या अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.