मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण अखेर आज (गुरूवार, २९ मार्च) मागे घेतले. दिल्ली येथील रामलिला मैदानावर अण्णांचे उपोषण सुरू होते. केंद्र सरकारने विविध मागण्या मान्य केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरबत घेऊन अण्णांनी उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतल्यावर अण्णांनी उपस्थित जनसमुदयाला मार्गदर्शन केले. या भाषणातील प्रमुख मुद्दे..


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आंदोलनासाठी ५ पैसेही विदेशातून घेतले नाहीत - अण्णा हजारे

  • आंदोलनात भारतभरातील लोकांचा समावेश- अण्णा हजारे

  • मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, सप्टेबरमध्ये पुन्हा आंदोलन ; अण्णांचा सरकारला इशारा,

  • राईट टू रिकॉल, राईट टू रिजेक्ट निवडणूक आयोगाला कळवणार, अण्णांची मागणी सरकारला मान्य

  • सरकार लवकरच लोकायुक्त नेमणार - अण्णा हजारे

  • कृषी उपकरणांवरील जीएसटी ५ टक्के करणार - अण्णा हजारे

  • केंद्रानं मागण्या मान्य केल्याने अण्णा हजारेंनी घेतली माघार...

  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सरबत घेऊन आण्णा हजारेंनी उपोषण सोडलं

  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडलं. केंद्र सरकारला अण्णांच्या मागण्या मान्य