ऐन दिवाळसणात मुंबईकरांची वाहतूक कोंडी होणार?
उड्डाणपूल ऑक्टोबरच्या अखेरीस दुरूस्तीसाठी बंद होण्याची शक्यता
मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईकर पुन्हा वाहतूक कोंडीत घुसमटणार आहेत. अतिशय वर्दळीचा समजला जाणारा शीव इथला उड्डाणपूल ऑक्टोबरच्या अखेरीस दुरूस्तीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. पुलाच्या बेअरिंग्ज बदलण्यात येणार आहेत. एका आठवड्यात नव्या बेअरींग्ज मुंबईत दाखल होतील.
त्यानंतर वाहतूक पोलिसांकडे पूल बंद ठेवण्यासाठी परवानगी मागण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
हे काम खरंतर मे महिन्यातच प्रस्तावित होतं. मात्र पावसाळ्यासाठी काम थोपवण्यात आलं. आता ऑक्टोबर अखेरपासून हे काम सुरू होणार आहे.