मुंबई : मुंबईतील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे. उड्डाण पुलाची दुरुस्तीसाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे.  ही कोंडी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी अनेक पर्याय शोधले आहेत. मात्र हे पर्याय कितपत यशस्वी होतात हे पाहावं लागेल.  शीवचा उड्डाण पूल १.१ किलोमीटर लांब आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी किमान पाच महिने लागणार आहे. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना पाच महिने तरी ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे. 


सहा तासांचा ब्लॉक


मध्य रेल्वेच्या मशीद स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात मशीद स्थानक इथल्या मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील आणि हार्बरच्या दोन्ही मार्गावरील धिमी वाहतूक सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत पूर्णत: बंद राहील.