मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील सायनचा पूल ( Sion bridge ) आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा पूल गेले चार दिवस वाहतुकीसाठी बंद होता. पुलाच्या बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी शुक्रवारपासून वाहतूक बंद होती. हा ब्लॉक काल संपणे अपेक्षित होते. पण काम वाढल्यामुळे आजपर्यंत हा ब्लॉक वाढवण्यात आला होता. मात्र आता ब्रीजवरील वाहतूक सुरु झाल्यान वाहनचालक आणि नागरिकांना थोड दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन उड्डाणपुलाचे (Sion Flyover  Bridge) बेअरिंग बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १४ फेब्रुवारीपासून काम हाती घेतले होते. हा पूल कालपासून वाहतुकीला सुरु करण्यात येणार होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही वाहतूक सुरु करण्यात आली नाही. दरम्यान, या पुलाचे काम पूर्णत्वाला गेल्यानंतर आजपासून हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. 



पूर्व उपनगरातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रखडले होते. मात्र शुक्रवारपासून हे काम सुरू करण्यास आले होते. १४ फेब्रुवारीपासून ते ६ एप्रिलपर्यंत काम सुरू राहणार आहे. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाने मंजूर केले आहेत. यातील पहिला ब्लॉक पूर्ण झाला आहे.