अमेरिकेहून परतला मुलगा, घरात सापडला आईचा सांगाडा
मुंबईतील प्रसिद्ध लोखंडवाला परिसरातील बेल्स्कॉट टॉवरच्या दहाव्या मजल्यावरील एका घरात ६३ वर्षीय महिलेचा सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लोखंडवाला परिसरातील बेल्स्कॉट टॉवरच्या दहाव्या मजल्यावरील एका घरात ६३ वर्षीय महिलेचा सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा मुलगा तब्बल दीड वर्षानंतर घरी परतला होता. जेव्हा त्याने घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या आईचा शरीराचा सांगाडा बेडवर होता.
आशा सहानी असं या महिलेचं ना आहे. त्यांच्या पतीचा मृत्यू २०१३मध्ये झाला. आशा यांचा मुलगा रितुराज साहनी अमेरिकेत आयटी इंजीनिअर आहे. आपल्या कुटुंबासमवेत तो अमेरिकेत राहत होता.
तब्बल दीड वर्षांपासून रितुराज यांचे आपल्या आईशी बोलणे झाले नव्हते. शनिवारी रितुराज भारतात परतला. यावेळी तो लोखंडवालामध्ये आपल्या घरी गेला असता त्याला बेडवर आईचा सांगाडा दिसला. दरम्यान हा मृत्यू आहे की आत्महत्या हे पोस्टमॉटर्म रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल.
पोलिसांच्या माहितीनुसार, आशा यांनी एप्रिल २०१६मध्ये अखेरचा आपल्या मुलाला फोन केला होता. त्यांना फ्लॅटमध्ये एकटे राहायचे नव्हते त्यामुळे आपल्याला वृद्धाश्रमात ठेवावे असे त्याने आपल्या मुलाला फोनवरुन सांगितले होते. या महिलेचा मृत्यू भूक आणि अशक्तपणामुळे झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे.