मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध केईएम या सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळल्यानं डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक धास्तावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या इमारतीत काल रात्री आठच्या सुमारास स्लॅब कोसळल्यानं दोन रुग्ण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली.


रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर १८ नंबरच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या कृत्रिम मूत्रपिंड विभागात हा अपघात झाला.


रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली. रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे हा अपघात झाल्याचं जखमींच्या नातेवाईकांचा आरोप आहे.