देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  म्हाडा सोडतीसाठी अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. म्हाडा सोडत अर्ज नोंदणीसाठी 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा असं आवाहन म्हाडा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 'म्हाडा'चं बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरुन म्हाडाच्या प्रकल्पांची, तसच किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध करण्यात येत असल्याचं म्हाडाच्या निदर्शनास आलंय. याशिवाय बोगस वेबसाईट्सच्या माध्यमातून अर्जदारांची फसवणूक होण्याचा धोकाही आहे.  म्हाडा लॉटरी  सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमधे सहभागी व्हावं असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. 


Whastapp ग्रुप,Youtube, Facebook द्वारे फसवणुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी सदनिका विक्री सोडतीच्या अनुषंगाने Whastapp ग्रुप,Youtube, Facebook या सोशल साईट्सवरुन अनधिकृत संकेतस्थळे, मुंबई मंडळाच्या येऊ घातलेल्या सोडतीबाबत ''म्हाडा''चे बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरुन म्हाडाच्या प्रकल्पांची, त्यांच्या आकारमानाची, किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध केली जात आहे. अशा बनावट जाहिरीतींच्या लिंक सोशल मिडियावर शेअर केल्या जात आहेत. म्हाडातर्फे कोणतेही व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले नाहीत अथवा कोणत्याही संकेतस्थळाला माहिती देण्यात आलेली नाही असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


Whastapp ग्रुप आलेल्या लिंकवर क्लिक करुन कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. सदनिका विक्री सोडतप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in तसेच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळांचा वापर करावा. 


म्हाडाचे साडे सात कोटींचे घर


'म्हाडा' च्या इमारत पुनर्रचन मंडळानं मुंबई मंडळाला दक्षिण मुंबईमध्ये 19 घरं वर्ग केली आहेत. ही घरं सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. यातील 6 घरं ताडदेव इथले आहेत. या प्रत्येक घरांची किंमत साडेसात कोटी इतकी आहे..


मुंबईत लवकरच ऑनलाईन पार्किंग आरक्षण


मुंबईत लवकरच ऑनलाईन पार्किंग आरक्षण सुविधा सुरू होणारेय. त्यामुळे घरातून निघण्याआधी ऍपवरून पार्किंग बुक करता येईल. त्यासाठी बीएमसी लवकरच एक ऍप कार्यान्वित करणारेय. महापालिकेच्या उपलब्ध 32 पार्किंगमध्ये व्यवस्था पुरेशी ठरत नाही. त्यामुळे पार्किंग धोरण राबवण्यात येतंय. यासाठी पालिका मुंबईतील खासगी सोसायटया, म्हाडा, सरकारी-खासगी कार्यालयांच्या मोकळया जागेत पार्किंगसाठी जागा निश्चित केली जाणारेय. शिवाय ऑन रोड आणि ऑफ रोड पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येईल. यामुळे मुंबईतील बेकायदा पार्किंगसह वाहतूककोंडीचा तसंच गाड्या चोरीची प्रश्नही सुटण्यास मदत होईल.