नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA च्या चेअरपर्सन सोनिया गांधी (Sonai Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. 20 ऑगस्ट अर्थात उद्या संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठकीत दूरदृष्यप्रणाली अर्थात ऑनलाईन (Online) माध्यमांद्वारे होणार असल्याची माहिती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला 4 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray), तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


शिवसेना यूपीएत सामील होणार?


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या (BJP-Shivsena) युती बाबत आशा मावळल्या का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना यूपीएत सामील होणार, असे संकेत मिळत आहेत.