मुंबई : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून आजच सोनू सूदवर टीका करण्यात आली होती. यानंतर लगेचच सोनू सूद मातोश्रीवर गेला. सोनू सूद याच्याबरोबर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी सोनू सूद याने मराठीमध्ये ट्विट केलं. 'स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,' असं सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.



कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सोनू सूदने आर्थिक मदत केली. यावरून संजय राऊत यांनी सोनू सूदवर निशाणा साधला. सोनू सूदला दत्तक घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचं राजकारण सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी सामनामधून केली. यानंतर सोनू सूदच्या बचावासाठी भाजपने पुढाकार घेतला.


सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत


सोनू सूदच्या बचावासाठी भाजपचा पुढाकार... राऊतांना चोख प्रत्युत्तर