Political News: मोठी बातमी! ठाकरे गटात गटबाजीचे राजकारण? पांडुरंग सकपाळांचा पायउतार
Politics News : मोठी बातमी मुंबईतल्या राजकारणातून. (Political News) दक्षिण मुंबईत शिवसेना ( South Mumbai Shiv Sena) पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
Mumbai Politics News : मोठी बातमी मुंबईतल्या राजकारणातून. (Political News) दक्षिण मुंबईत शिवसेना ( South Mumbai Shiv Sena) पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. (Politics News) विभागप्रमुख म्हणून गेली 12 वर्ष कार्यरत असणाऱ्या पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांची तडकाफडकी पदावरुन हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती 'सामना' वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. (Mumbai Political News)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथाीदार अशी पांडुरंग सकपाळ यांची ओळख आहे. मात्र त्यांना पदावरुन हटवल्यानं दक्षिण मुंबईतली शिवसेनेतली पक्षांतर्गत गटबाजी उघड झाली आहे. स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या दबावाच्या राजकारणाचीही जोरदार चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये आहे.
दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अचानक मोठे बदल करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून गेली 12 वर्षे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार पांडुरंग सकपाळ यांची तडकाफडकी बदली करुन त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलीय तशी माहीती, आजच्या सामानामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या पडत्या काळात ज्यांनी छातीची ढाल करुन शिवसेनेचा भगवा दक्षिण मुंबईत फडकत ठेवला, अशा जुण्या जाणत्या शिवसैनिकांना बदलून नव्या लोकांना पदावर बसवण्यामागे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांचे दबावाचे राजकारण असल्याचं शिवेसनेत अंतर्गत बोललं जातंय. त्यामुळे गेल्या वर्षभरात शिवसेनेत आलेल्या राजकीय आपत्तीनंतरही शिवसेनेत पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा आहे.