COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपील राऊत, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून रस्त्यानं मुंबईत येणार असाल तर नक्की या पण पुलंच्याच भाषेत सांगयाचं तर  सल्ला की पुन्हा एकदा विचार करा..मुंबई गेल्या महिन्यात झालेल्या गोखले पूलाच्या दुर्घटनेनंतर पालिका आणि रेल्वे प्रशासन अचानक इतकं सतर्क झालंय...की त्यांना धोकादायक पुलांचा मोठा खजिनाच जणू हाती लागलाय...होय...येत्या आठवड्यात मुंबईकरांचा रस्ते प्रवास म्हणजे विकतचा मनस्ताप ठरणार आहे.


मुंबईत येण्याआधी विचार करा 


अंधेरीतला गोखल पूल ६ ऑगस्टपासून ३ सप्टेंबरपर्यंत म्हणजे २७ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याणचा पत्रीपूल म्हणजे कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणारा दुवाच...आता हा पूलच पाडण्याचे आदेश  रेल्वे प्रशासनाने दिलेत. तर मुंब्र्यातला बायपासवरच्या उड्डाण पुलाचं काम अद्यापही उरकलेलं नाही. त्यामुळे दररोज ठाणेकर आणि डोंबिवलीकराचं मुंबईकडे येणं आधीच दुरापास्त बनलंय.


एकूण पावसामुळे रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यात अशी तिहेरी कोंडी..यामुळे मुंबईतल्या रस्त्यांवरून प्रवास करणं पुढचा किमान महिनाभर डोकेदुखीचं ठरणार आहे. म्हणूनच मुंबईत येणं टाळलेलंच बरं...