मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या झोटींग समितीवर सरकारनं ४५ लाख ४२ हजार रुपये खर्च केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड झालीय. त्यासाठी न्यायमूर्ती दिनकर झोटींग यांना २३ जून २०१६ ते १५ जुलै २०१७ च्या काळातली वेतनापोटी २८ लाख २१ हजार रुपये देण्यात आले.


तर दूरध्वनी, पेट्रोल, वर्तमानपत्र, वीज, पाणी इत्यादींवर १ लाख ६८ हजार ०३५ रुपये खर्च करण्यात आला. तर समितीसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याला तब्बल १५ लाख १३ हजार ००१ खर्च झाला आहे.