SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
मुंबई : एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज (SSC Online Form) दाखल करण्याच्या तारखा जाहीर (Date Declared) करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांचे अर्ज इतके घाईगडबडीत दाखल करून घेण्यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे.
२३ डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत मुदत आहे. पुनर्परिक्षार्थींसाठी १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. www. Mahahsscborad.in वर दाखल करायचे अर्ज भरू शकतात.
त्याचप्रमाणे आज दहावीच्या मार्कशीटबाबत ( Marksheet) गुडन्यूज देण्यात आली. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना मार्कशीट (Students Marksheet) घरपोच देण्याची सोय परीक्षा मंडळाने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीची मार्कशीट (10th standard Marksheet) घरीच मिळणार आहे.
कोणत्याही व्यक्तीला यापुढे चार वेळा ऑनलाईन मार्कशीट (Marksheets will be available online) मागविता येणार आहे. hhtp://kseeb.kar.nic.in या संकेत स्थळावरून आपले गुणपत्रक मागवता येणार आहे. सरकारी कामांसह नोकरी मिळविण्यासाठी दहावीची मार्कशीट गरजेची असते तर ही मार्कशीट वेळेत न मिळाल्याने अनेकांची कामे अडून राहतात. मात्र यापुढे मार्कशीट ऑनलाईन मिळवता येणार असल्याने अनेकांचा त्रास कमी होणार आहे.