ST Strike : एसटी कर्मचारी संप : अनिल परब - शरद पवार यांच्यात महत्वाची चर्चा
ST Employees Strike : परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे चर्चा झाली.
मुंबई : ST Employees Strike : परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे दहा मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत ST कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्वाची चर्चा झाली. (ST Strike: Important discussion between Anil Parab and Sharad Pawar) हा संप समन्वयाने सुवर्णमध्य काढत कसा मिटवता येईल, या संदर्भात चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे.
परिवहन मंत्री अनिल परब शरद पवारांच्या भेटीसाठी सकाळी सिल्वर ओकवर दाखल झालेत. राज्य सरकारने आवाहन करुनही संप सुरुच ठेवण्यात आला आहे. संप चिघळत आहेत. सरकारशी बोलणी करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे एसटी संपाबाबत चर्चा करण्यासाठी अनिल परब शरद पवार यांच्या भेटीला गेले.
दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची संपाबाबत भेट घेतली होती. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर अनिल परब शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे 125 कोटींचं नुकसान आहे.