मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचं हत्यार उगारलं आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून संपावर जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो देखील निष्फळ ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचारी संघटनांनी अनेक दिवसांपासून आपल्या मागण्या ठेवल्या होत्या पण महामंडळाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये सामील करून घेण्याची तसेच पगारवाढीची देखील मागणी आहे.


आज मध्य रात्रीपासून संपाला सुरूवात होणार असल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. या आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांचे, तसेच दिवाळीला घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. कोंडी करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी दिवाळी सणाचं टायमिंग साधलं आहे.


एकिकडे एसटीला होणारा नफ्यात वाढ होतात दिसत आहे, दुसरीकडे कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणीही तीव्र होत आहे, तर राज्य सरकारमध्ये एसटी विलीन करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर धरत असताना, एसटीचे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पादचारी प्रवाशांना धडक देण्याचा एसटीचा आकडा देखील वाढल्याचं समोर आलं आहे.