मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरळसेवा भरती 2016-17 अंतर्गत लिपिक-टंकलेखक कनिष्ठ पदासाठीची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांच्याकडे पुरेशी संगणक यंत्रणाच बसवण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशवंत कॉलेज ऑफ  इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथे ऑनलाईन पद्धतीने परिक्षा आयोजित केली होती. त्या एजन्सीने परीक्षेच्या वेळेपर्यंत ऑनलाइन परीक्षेसाठी लागणारी आवश्यक संकणक लॅबच तयार केलेली नाही. 


एका दिवसातून 3 बॅच मध्ये 660 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची होती. पण लॅबमध्ये केवळ चाळीस विद्यार्थी बसतील येवढीच संगणक क्षमता उपलब्ध होती. त्यामुळे एकाच वेळी एका बॅचला 220 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण शक्य नव्हतं. 


परीक्षेच्या पहिल्याच दिवशी असा गोंधळ उडाल्याने राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची हेळसांड झाल्याचं बघायला मिळालं.  तब्बल दोन तास वाट बघूनही परिक्षा सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दूरुन एक दिवस आधी मुक्कामी आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्याने विद्यार्थ्यानी निषेध केला.