मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  एसटी संपाबद्दल गेल्या काही दिवसांत पहिल्यांदाच तोडगा दृष्टीपथात आल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिवहन मंत्री अनिल परब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यातली चर्चा सकारात्मक झाल्याचं अनिल परबांनी सांगितलं आहे. 


समितीचा अहवाल येईपर्यंत आणि विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत कर्मचा-यांपुढे अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचं कळत आहे. 


वेतनवाढीच्या निर्णय़ावर एसटी कर्मचा-यांचं म्हणणं काय आहे, याचा निर्णय आज सकाळी एसटी कर्मचारी घेणार आहेत. 


आज सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार आहे. एकिकडे कर्मचारी संपामध्ये त्यांच्या मागण्यांवर ठाम असतानाच आता शासकीय आणि न्यायालयीन पातळीवरही या विषयावर घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे.


बहुतांश एसटी कर्मचारी त्यांच्या विलिनीकरणाऱ्या मागणीवर ठाम आहेत.



वेतनवाढ देऊनही थकित वेतनच देण्यात इतकी दिरंगाई होताना वाढीव वेतनाबाबतचं चित्र धुसरच असल्याची प्रतिक्रिया मुंबईतील आझाद मैदान येथे असणाऱ्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.