मुंबई : एसटी कर्मचारी आंदोलक सिल्वर ओक (Silver Oak) परिसरात आक्रमक झाले आहेत. शरद पवारांच्या (Sharad Pawar) सिल्वर ओक या निवासस्थानी अचानकपणे आंदोलकांनी धडक दिली. आंदोलकाकडून चप्पल फेक आंदोलक करण्यात आलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणबाजी सुरु आहे. आंदोलन सुरु असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही या ठिकाणी दाखल झाले आहेत. (NCP and ST workers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सर्व आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. चर्चेसाठी तयार आहे. चप्पल फेक आणि दगड फेक करुन प्रश्न सुटणार नाहीत. असं आवाहन त्यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील सुप्रिया सुळे यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी चांगलं काम केलं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.