मुंबई : एसटी कर्मचारी आज अचानकपणे शरद पवारांच्या घरावर धडकले. आंदोलकांनी शरद पवार यांच्या घराबाहेर संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. अचानक आंदोलक शरद पवारांच्या घरावर धडकल्याने पोलीस यंत्रणेचं अपयश पुढे आलं. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse patil) यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्री (Home minister) दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं की, या आंदोलनामागे अज्ञात शक्ती आहे. चिथावणी देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवारांच्या घरावर जाणून-बुजून आंदोलन करण्यात आलं. गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी तपासल्या जातील.'


एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले. आंदोलकांना आता येथून पांगवण्यात आलं आहे.