स्टेट बँकेचे व्यवहार महागणार, १ जूनपासून नवीन नियम
भारतीय स्टेट बँक (SBI) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करणार आहे. त्यामुळे बॅंकचे व्यवहार महागणार आहेत. यामुळे विविध सेवांसाठी खिसा रिकामा होणार आहे.
मुंबई : भारतीय स्टेट बँक (SBI) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करणार आहे. त्यामुळे बॅंकचे व्यवहार महागणार आहेत. यामुळे विविध सेवांसाठी खिसा रिकामा होणार आहे.
१ जूनपासून SBI नवीन नियम लागू करणार आहे. या नियमानुसार, जीर्ण तसेच फाटलेल्या नोटा बँकेकडून बदलून घेणाऱ्या ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार आहे. त्याचसोबत बचत खात्यातून पैसे काढणाऱ्या खातेदारांकडूनही शुल्क आकारणी केली जाणार आहे. चार व्यवहारानंतर ५० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मर्यादेपेक्षा अधिक पैसे काढल्यास प्रत्येक व्यपहारावर २० रुपये घ्यावे लागणार आहेत. तसेच त्यावर सेवा करही असणार आहे.
तसेच खराब किंवा फाटलेल्या नोटा बदलल्यास यासाठी आता शुल्क आकारले जाणार आहे. फाटलेल्या तसेच खराब झालेल्या नोटा एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून बदलल्यास २ ते ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
२० पेक्षा जास्त नोटा किंवा ५ हजार रुपये मूल्य असलेल्या नोटा बॅंकेतून बदलल्यास संबंधित शुल्क आकारण्यात येईल. सेवाशुल्क वेगळे द्यावे लागेल.
२० पेक्षा कमी नोटा आणि ५ हजार रुपये मूल्य नसलेल्या नोटा बदलल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
एटीएममधून अतिरिक्त व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच सेवा कर हा वेगळा असणार आहे. तसेच बॅंक व्यतिरिक्त दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून अतिरिक्त व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर २० रुपये आकारण्यात येणार आहेत. यावरही सेवा कर असणार आहे. त्यामुळे ग्राहकाला आता एसबीआयची सेवा महाग ठरणार आहे.